Article Details

एलेन शोवॉल्टरप्रणीत “स्त्रीविशिष्ट अनुभव”: संकल्पना व उपयोजन | Original Article

Sheetal Pawaskar Bhosale*, in Journal of Advances and Scholarly Researches in Allied Education | Multidisciplinary Academic Research

ABSTRACT:

पुरुषकेंद्री (Androcentric) तत्त्वविचारातील मूल्यनिकषांपेक्षा वेगले निकष मानणाऱ्या स्त्रीकेंद्री समीक्षापद्धतीची (Gynocentric Criticism) गरज निर्माण होणे, हा स्त्रीच्या आत्मशोधनाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. स्त्रीकेंद्री समीक्षेचा प्रारंभबिंदू म्हणून, व्हर्जिनिया वुल्फप्रणीत तात्त्विक भूमिकेकडे निर्देश केला जातो. आणि या समीक्षापद्धतीची सैद्धांतिक मांडणी करण्याचे श्रेय, अँग्लो-अमेरिकन स्त्रीवादी समीक्षक एलेन शोवॉल्टर यांना दिले जाते.